International Yoga Day Messages in Marathi: आंतरराष्ट्रीय स्तरावर योग आणि त्याचे महत्त्व पोहचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 साली सुरू करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. यंदा 7 वा योग दिन 21 जून रोजी साजरा केला जाईल. 21 जून हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योगाचा सतत अभ्यास केल्याने त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते. यासोबत या योग दिनी या खास दिवसाच्या निमित्ताने यंदा तुमच्या मित्र परिवाराला योग दिनाच्या खास मराठी भाषेतून शुभेच्छा देण्यासाठी या Greetings, Wishes, WhatsApp Status, Quotes , Facebook Image वापर तुम्ही करू शकता.
नियमित करा योग
आयुष्यभर दूर ठेवा रोग
Happy International Yoga Day
नियमित केल्याने योग दूर होतात
सारे शारीरिक आणि मानसिक रोग
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नियमित योग हीच उत्तम आरोग्य
आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे…!
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जेथे योग वसे, तेथे रोग नसे
योग दिनाच्या शुभेच्छा…!