अधिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कमला किंवा पद्मिनी एकादशी म्हणतात. पुरुषोत्तम मासातील दुसरी म्हणजेच वद्य पक्षातील एकादशी शनिवार, १२ ऑगस्ट २०२३ रोजी आहे. पुरुषोत्तम एकादशीचे यशस्वी व्रताचरणामुळे मोक्षप्राप्ती होते. मनोकामना, प्रबळ इच्छा पूर्ण होतात. श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. श्रीविष्णूंसह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टीही राहते. त्यामुळे श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कमला एकादशीचे व्रत आवर्जुन आचरावे.
कमला एकादशी दर तीन वर्षांनी एकदा येते, कारण अधिक मास दर तीन वर्षांनी येत असतो. मलमास पडतो तेव्हा त्या वर्षी 24 ऐवजी 26 एकादशींचे व्रत होते. एखाद्याची विशेष इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यांनी कमला एकादशीचे व्रत करावे.
पौराणिक कथेनुसार, महिष्मती पुरीचा राजा कृतवीर्य याला 1000 राण्या होत्या, परंतु एकीकडूनही पुत्र प्राप्त झाला नव्हता. कृतवीर्य राजाने गंधमान पर्वतावर 10 हजार वर्षे घोर तपश्चर्या केली, पण त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही. तेव्हा अनुसूयाने राणी कमलाला सांगितले की, मलमास शुक्ल पक्षातील एकादशी व्रताचे पालन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीहरीच्या कृपेने तुला पुत्रप्राप्ती होईल. यानंतर राणी कमला मलमास येण्याची वाट पाहू लागली. मलमास शुक्ल पक्षातील एकादशीला व्रत पाळले. रात्रीच्या जागरणानंतर व्रत पार पडले. तिच्या व्रताने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. राणी गरोदर राहिली आणि तिला मुलगा झाला. कमला एकादशीचे व्रत संतती वाढीसाठीही पाळले जाते. अशी कथा आहे.
कमला एकादशी व्रत पूजेची वेळ
शनिवार १२ ऑगस्ट २०२३ रोजी कमला एकादशी व्रत आचरले जाईल.
एकादशी तिथी प्रारंभ - ११ ऑगस्ट, सकाळी ७ वाजून ३६ मिनिटे.
एकादशी तिथी समाप्ती - १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटे.
पूजा
स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. चौरंगावर लाल कपडा पसरवून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा आणि पूजेचे साहित्य चौरंगाखाली ठेवा. यानंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा. यानंतर भगवान विष्णूची आरती करा.