इतर

घरच्या घरी बनवा टेस्टी रसमलाई, येथे वाचा रेसिपी

Published by : Siddhi Naringrekar

अनेक वेळा घरात ठेवलेले दूध काही कारणाने फुटते. अशा परिस्थितीत, बहुतेक घरांमध्ये, लोक एकतर फाटलेले दूध फेकून देतात किंवा त्याचा योग्य वापर करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला फाटलेल्या दुधाचा योग्य वापर कसा करायचा ते सांगत आहोत. तुम्ही एक स्वादिष्ट-चविष्ट गोड पदार्थ बनवू शकता. जाणून घ्या सोपी पद्धत

साहित्य

1 लिटर फाटलेले दूध लागेल. साखर दोन वाट्या, कॉर्नफ्लोअर एक चमचा, ताजे दूध अर्धा किलो. याशिवाय बदाम 8 ते 10, पिस्ते 6 ते 8 आणि केशराचे दोन ते तीन धागे

सर्व प्रथम फाटलेले दूध आणखी काही वेळ उकळवा. उकळी आल्यानंतर पातळ सुती कापडात टाकून पाणी काढून बाजूला ठेवा. यानंतर, फाटलेल्या दुधातून निघालेल्या या क्रीममध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करा आणि बराच वेळ हाताने घासत राहा, जेणेकरून क्रीम आणि कॉर्नफ्लोअर चांगले मॅश होतील. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचे छोटे गोळे करून प्लेटमध्ये ठेवा. आता एका पातेल्यात साखर आणि एक कप पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवा. एक उकळी आल्यावर या साखरेच्या पाण्यात सर्व गोळे टाका.

यानंतर ताजे दूध एका वेगळ्या भांड्यात काढून त्यात ड्रायफ्रुट्स टाकून उकळवा. दूध घट्ट होईपर्यंत उकळा. नंतर उत्तम रंग आणि चवीसाठी त्यात केशराचे धागे घाला. आता हे गोळे साखरेच्या पाकातून काढून केशर दुधात टाका. सुमारे 1 तास राहू द्या, जेणेकरून गोळे दूध चांगले शोषून घेतील. यानंतर रसमलाई सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमची रसमलाई तयार आहे. ही रेसिपी एकदा नक्की करून पहा.

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...

Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका