चटकदार

तुम्हीही पराठ्यासोबत दही खाता का? तर सावधान, नाहीतर होतील 'या' समस्या

हिवाळ्यात पराठे खायला सर्वांनाच आवडते. बर्‍याच जणांना दहीसोबत पराठे खायला आवडतात. परंतु, हे टाळण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dahi Paratha Combination : हिवाळ्यात पराठे खायला सर्वांनाच आवडते. त्यात वेगळीच मजा आणि चव असते. या ऋतूत थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जेची गरज असल्याने पराठे खूप उपयुक्त आहेत. घरी बटाटे, कांदे, चीज, पालक, मुळा आणि इतर गोष्टींनी पराठे बनवले जातात. बर्‍याच जणांना दहीसोबत पराठे खायला आवडतात. परंतु, हे टाळण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. दही आणि पराठा एकत्र खाल्ल्याने अनेक दुष्परिणाम होतात. चला तर जाणून घेऊया...

दही आणि पराठा एकत्र का खाऊ नये?

वास्तविक, पराठ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट जास्त असतात. तर दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्यास पचनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हे टाळावे. अन्यथा, पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

पराठा आणि दही एकत्र खाण्याचे तोटे

1. पचन समस्या

तज्ञांच्या मते, पराठा आणि दही दोन्ही जड असतात, जे नीट पचत नाहीत किंवा पचायला खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत जेव्हा दोन्ही एकत्र सेवन केल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

2. वजन वाढणे

पराठा आणि दही या दोन्हीमध्ये भरपूर कॅलरीज असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ले की वजन झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे तुमचा फिटनेस सुधारायचा असेल आणि वजन वाढवायचे नसेल तर दही आणि पराठे एकत्र खाऊ नका.

3. त्वचेच्या समस्या

पराठा आणि दही दोन्ही आम्लयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही एकत्र सेवन केल्यास त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. दह्यासोबत पराठे खाल्ल्याने मुरुम होऊ शकतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य खराब होऊ शकते. त्यामुळे हे टाळावे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा