चटकदार

रात्रीच्या उरलेल्या भाताचं करायचे काय? ट्राय करा चविष्ट गुजराती रोटला

अनेक वेळा रात्रीचा भात उरतो. मग या उरलेल्या भाताचे काय करायचे असा विचार आपल्या मनात येतो. तुम्ही यापासून गुजराती रोटलासारखी स्वादिष्ट डीश बनवू शकता.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Gujarati Rotla Recipe: तांदूळ हा देशातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांपैकी एक आहे. अनेकजण रोटीपेक्षा भात खाणे पसंत करतात. परंतु, अनेक वेळा रात्रीचा भात उरतो. मग या उरलेल्या भाताचे काय करायचे असा विचार आपल्या मनात येतो. कचराकुंडीत टाकून वाया जाऊ द्यायचे का? हा मार्ग नाही. त्याऐवजी, तुम्ही यापासून गुजराती रोटलासारखी स्वादिष्ट डीश बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवतात गुजराती रोटला...

साहित्य

उरलेला भात

पीठ

मीठ

कांदा

हिरवी मिरची

कोथिंबीर

मिरची पावडर

दही

मसाला

गरम मसाला

कृती

ही रेसिपी उरलेल्या भातापासून बनवली आहे. हे बनवण्यासाठी उरलेला भात, पीठ, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला आणि मीठ एका भांड्यात चांगले मिसळून घ्यावे. आणि ते पिठासारखे मळून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की तांदळाचे दाणे खूप लांब आहेत तर तुम्ही ते बाकीच्या घटकांसह मिसळण्यापूर्वी थोडेसे मॅश करू शकता. आता पिठाचा थोडासा भाग घ्या आणि चपातीप्रमाणे लाटून घ्या. मंद आणि मध्यम आचेवर तवा गरम करून त्यात रोटला दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. तुमचा भाताचा रोटला तयार आहे. त्यावर बटर घाला आणि दही किंवा लोणच्याबरोबर गरमा-गरम सर्व्ह करा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur : गणेशोत्सवात शेतकऱ्यांना दिलासा ;गोकुळ दूध संघाकडून दुधाच्या दरात 'इतक्या' रुपयांची वाढ

Lalbaugcha Raja 2025: नवसाला पावणाऱ्या राजांच्या चरणी देशभरातून भाविकांचे भरपूर दान; रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का! आत्तापर्यंत 'एवढ्या' रुपयांचे दान

Amit Shah Mumbai Tour : अमित शाह मुंबईत दाखल ; यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार

Latest Marathi News Update live : ठाण्यात आज मनसेचा मेळावा