इतर

Ashadhi Ekadashi Special : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय तर ट्राय करा 'उपवासाचे थालिपीठ'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

आज आषाढी एकादशी. महाराष्ट्रमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर वारीला जाण्याची परंपरा फार जुनी आहे. या एकादशीनिमित्त अनेक जण उपवास करतात. परंतु, या उपवासा दिनी सातत्याने साबुदाणा खिचडी अथवा वरईचा भात-आमटीच खाली जात असल्याने अनेकदा हे पदार्थ खाण्यास कंटाळा येतो. परंतु, याच रटाळ पदार्थांमधून काहीतरी वेगळे बनविण्याचे सोप्या रेसिपिज् आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

साबुदाण्याचे थालिपीठ

साहित्य : साबुदाणा, 2 बटाटे, शेंगदाणे, 1/2 कप राजगिऱा पीठ, दोन हिरव्या मिरची, तूप, जीरा, लिंबुचा रस, कोथिंबीर, मीठ, एक कप दही

कृती : साबुदाणे दोन-तीन वेळा पाण्याने धुवून घ्या. व नंतर दोन तास चाळणीत भिजवून ठेवा. दोन बटाटे उकडवून घ्या व त्याला व्यवस्थित कुस्करून घ्या. नंतर 1/4 कप शेंगदाणे घेउन त्याला व्वस्थित भाजून घ्या व मिक्सरमध्ये बारीक करा. आता साबुदाणा, 2 बटाटे, शेंगदाणे, 1/2 कप राजगिरा पीठ, दोन हिरव्या मिरची, तूप, जीरा, लिंबुचा रस, कोथिंबीर, मीठ, एक कप दही हे सर्व साहित्य एका भांड्यात एकजीव करुन घ्या. आणि मऊ असे पीठ तयार करुन घ्या.

यानंतर पोलपाठ वरती एक प्लास्टीकचा तुकडा ठेवावा. त्यावर तेल लावून घ्या. व त्यावर साबुदाण्याचे पीठाचा एक तुकडा घेऊन हलक्या हाताने त्याला पसरावावे. यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, थालिपीठ जास्त पातळ करु नये थोडे जाडच ठेवावे. यानंतर मीडियम फ्लेमवर गॅसवर तवा ठेवावा. व थालिपीठ तव्यावर टाका. व हलक्या हाताने दाब द्या. तूप लावून लाल होईपर्यंत भाजावे. हे थालिपीठ तुम्ही चटणी अथवा दही, कोशिंबीरसोबत खाऊ शकता.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस