Vidhansabha Election

Sisters should stand with Chief Minister Eknath Shinde: 'लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत खंबीरपणे उभं रहावं...'

भाऊबीजनिमित्त लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहावं अशी अपेक्षा सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Published by : Team Lokshahi

यावेळची विधानसभा निवणुक लक्षवेधी असल्याचं सांगितलं जातंय. बऱ्याच मतदारसंघात हायप्रोफाईल अशी लढत पहायला मिळतेय. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. तर शिंदेंच्या विरोधात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे हे निवडणूक लढणार आहेत.

आपल्या पक्षाच्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी प्रत्येकजण आता प्रचाराच्या तयारीला लागला आहे. अशातच आज भाऊबीज आहे आणि या भाऊबीजनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लाडक्या बहिणीने खंबीरपणे उभं रहावं असं आवाहन सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलंय.

तसंच महाविकास आघाडीच्या सर्व हालचाली दिल्लीतून चालतात असं संजय राऊत म्हणाले तरी वाईट वाटून घेऊ नका. ठाकरे गट हा पक्ष महिला विषयी आदर करत नाही. असं म्हणत पाटील यांनी मविआवर निशाणा साधलाय. यासोबतच अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी हात जोडून महिलांची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलीये.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सगळ्या भाषा आम्ही राष्ट्रभाषा मानतो, आरएसएसची प्रतिक्रिया

RSS On Language Row : 'स्थानिक भाषेला प्राधान्य द्या'; भाषा वादावर RSS ची पहिली प्रतिक्रिया

Bill Gates : सीईओ स्टीव्ह बॉल्मर पाचव्या क्रमांकावर; तर बिल गेट्स जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर

Money Doubling Scam : 'पैसे दुप्पट होतील'; असं सांगत शिर्डीत तब्बल 300 कोटींचा घोटाळा, आरोपीला बेड्या