india vs pakistan | Asia Cup
india vs pakistan | Asia Cup team lokshahi
क्रीडा

IND vs PAK Asia Cup: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी प्रोमो व्हिडिओ व्हायरलं

Published by : Shubham Tate

asia cup 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप टी-20 सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत. 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. यासाठी स्टार स्पोर्ट्सने एक प्रोमो व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम दिसत आहेत. (asia cup 2022 india vs pakistan match promo video viral on social media)

प्रोमो व्हिडिओमध्ये रोहित शर्मा फलंदाजी करताना दिसत आहे. पार्श्वभूमीत रोहित शर्माचा आवाज ऐकू येतोय. तसेच लोक आवाज करत आहेत.

शाहीनच्या आव्हानासाठी रोहित सज्ज

व्हिडिओच्या शेवटी, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत असल्याचे दिसत आहे. त्याच्यासमोर रोहित शर्मा फलंदाजीसाठी सज्ज दिसत आहे.

यावेळी आशिया कप युएईमध्ये खेळवला जाणार आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकली आहे. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन राहिला आहे. भारताने शेवटच्या वेळी 2018 मध्ये बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. याशिवाय टीम इंडिया 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 मध्ये आशिया कप चॅम्पियन राहिली आहे.

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?