Narendra Modi Stadium Team Lokshahi
क्रीडा

IPL 2022 : समारोप कार्यक्रमात बॉलिवूड ठसका; कोण जिंकणार आयपीएल 2022चे विजेतेपद?

IPL 2022 अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.

Published by : shamal ghanekar

आयपीएल 2022 (Ipl 2022 ) अंतिम सामना हा अहमदाबादमधील (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे. यावेळी आयपीएल 2022 ची ट्रॉपी कोणत्या संघाकडे जाणार हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होते. आता या आतुरतेला पुर्णविराम लागणार आहे. 'गुजरात टायटन्स' विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Gt Vs Rr) या दोन टीममध्ये महाअंतिम सामना रंगणार आहे. या दोन्ही टीमने चांगली कामगिरी करत फायनलपर्यंत पोहचले आहेत.

'गुजरात टायटन्स' (Gujarat Titans) विरूद्ध 'राजस्थान रॉयल्स' (Rajasthan Royals) सामन्याला आज 29 मेला सायंकाळी 7.30 वाजता नाणेफेक होणार असून 8 वाजता सामना खेळला जाणार आहे. सामना सुरू होण्याआधी 50 मिनिटे समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये भारतीय संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) उपस्थित राहणार आहे. हा समारोपाचा कार्यक्रम संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणार आहे. 2019मध्ये पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हा समारोपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर हा समारोपाचा कार्यक्रम कोरोनाचा होणारा संर्सगामुळे कार्यक्रम करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

'राजस्थान रॉयल'ने शेन वॉर्नच्या (Shane Warne) नेतृत्वामध्ये आयपीएल 2008चे विजेतेपद पटकावले होते. आता 14 वर्षांनी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. संजु सैमसनच्या (Sanju Samson) नेतृत्वाने 'गुजरात टायटन्स'चा पराभव करणार का ? ते पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी एका विजयाची आवशक्यता 'राजस्थान रॉयल्स'ला आहे.

तसेच यंदाच्या वर्षीं आयपीएल 2022च्या स्पर्धेत प्रवेश करणारी आणि अंतिम सामन्यामध्ये पोचण्यासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणारी टीम म्हणजे 'गुजरात टायटन्स' आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya ) नेतृत्व आणि संपूर्ण टीमने चांगली कामगिरी केली आहे. आता हे पाहणे खूप महत्वाचे आहे की, 'गुजरात टायटन्स' आयपीएल 2022 चे विजतेपद पटकावणार का ?

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा