Deepak Chahar weds Jaya Bhardwaj
Deepak Chahar weds Jaya Bhardwaj  team lokshahi
क्रीडा

IPL | भारताचा स्टार खेळाडू अडकणार लग्नाच्या बेडीत, भरमैदानात केले होते प्रपोज

Published by : Shweta Chavan-Zagade

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 1 जून रोजी दीपक चाहर आणि जया भारद्वाजसोबत आग्रा येथे 7 फेऱ्या घेणार आहे. त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. गतवर्षी दीपक चाहरने आयपीएलच्या सामन्यानंतर स्टेडिअममध्येच जया भारद्वाजला प्रपोज केले होते. यावर जयाने हो म्हटलं होतं. दीपकच्या बहीणीने या दोघांची भेट घडवून आणली होती.

स्टेडिअममध्ये केले होते प्रपोज -

गतवर्षी आयपीएलचा दुसरा टप्पा दुबईत पार पडला होता. 7 ऑक्टोबर रोजी चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामना पार पडला. सामना संपल्यानंतर दीपक चाहरने स्टेडिअममध्येच जया भारद्वाज हिला लग्नासाठी प्रपोज केले होते. दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. जेव्हा दीपकला जयानं होकार दिला, त्यावेळी दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली.

कोण आहे जया भारद्वाज?

दीपक चाहरची होणारी पत्नी जया भारद्वाज दिल्लीमधील बारहखंबा येथे राहणारी आहे. बिग बॉस-5 (वर्ष-2011) मध्ये सहभाग नोंदवलेल्या अभिनेता सिद्धार्थ भारद्वाजची बहिण आहे. सिद्धार्थ MTV चा प्रसिद्ध शो स्पिल्ट्स विला सह इतर अनेक शोमध्ये दिसलाय. जया भारद्वाजने MBA केलेले आहे. जया एका टेलीकॉम कंपनीमध्ये डिजिटल प्लेटफार्म प्रमुख आहे. दीपक चाहर बहिण मालती चाहरमार्फत जयाला भेटला होता. तेथूनच दोघांमध्ये प्रामाचे अंकूर फुटले.

दीपकला CSK ने 14 कोटींना घेतले विकत

यावेळी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला 14 कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र दुखापतीमुळे तो IPL मधून बाहेर पडला होता. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या T20 मालिकेदरम्यान 29 वर्षीय खेळाडूला दुखापत झाली होती.

यंदा आयपीएलमध्ये नाही चाहर

दीपक चाहरला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या मेगा ऑक्शन 2022 मध्ये तब्बल 14 कोटी रुपयांत खरेदी केले होते. पण दीपक चाहर चेन्नईसाठी एकही सामना खेळू शकला नाही. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच दीपक चाहर दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो संपूर्ण आयपीएलला मुकला.

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल