क्रीडा

आशियाई स्पर्धेआधी भारताला मोठा धक्का! धावपटू द्युती चंदवर 4 वर्षांची बंदी

आशियाई स्पर्धा जवळ असताना भारताला धावपटू द्युती चंदच्या रुपाने धक्का बसला आहे. द्युती चंदवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धा जवळ असताना भारताला धावपटू द्युती चंदच्या रुपाने धक्का बसला आहे. द्युती चंदवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणी तिच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. द्युतीच्या चाचणीत सिलेक्टिव्ह एंड्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर (एसएआरएम) आढळले.

वृत्तानुसार, नाडाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी द्युतीचा नमुना घेतला होता. द्युतीच्या पहिल्या नमुन्यात अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळले आहेत. तर, दुसऱ्या नमुन्यात अँडारिन आणि ऑस्टारिन आढळले आहेत. द्युतीला पुन्हा नमुना चाचणी देण्याची संधी होती. त्यासाठी तिला ७ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र द्युतीने तसे केले नाही. यामुळे द्युतीवर चार वर्षांची बंदी असून जानेवारी 2023 पासून विचारात घेतली जाईल.

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) या वर्षी जानेवारीमध्ये द्युतीला निलंबित केले होते. याच कारणामुळे ती आत्तापर्यंतच्या सर्व स्पर्धांमधून बाहेर पडली होती. ती सध्या राष्ट्रीय शिबिराचा भाग नाही. 5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये द्युतीची चाचणी घेण्यात आली होती.

विशेष म्हणजे दमदार कामगिरीच्या जोरावर द्युती चंदने अनेक वेळा तिरंगा फडकवला आहे. द्युतीने आशियाई क्रीडा 2018 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेमध्ये दोन रौप्यपदक जिंकले होते. तिने 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये दोन पदके जिंकली. याआधी 2013 मध्ये पुण्यात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. 2017 मध्ये भुवनेश्वरमध्येही तिने कांस्यपदक जिंकले आहे. द्युतीने दक्षिण आशियाई खेळ 2016 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. यासह २०० मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले होते. 2021 मध्ये तिने ग्रां प्रीमध्ये 100 मीटरची शर्यत 11.17 सेकंदात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम केला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा