Shikhar Dhawan  Team Lokshahi
क्रीडा

हॅप्पी बर्थडे गब्बर! जाणून घ्या शिखर धवनच्या आयुष्यातील खास गोष्टी

भारतीय क्रिकेट संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन आज त्याचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by : Sagar Pradhan

आज शिखर धवनचा वाढदिवस त्यानिमित्ताने आज आपण त्याच्याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊ. शिखर धवन यांचा जन्म ५ डिसेंबर १९८५ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुनैना धवन आणि वडिलांचे नाव महेंद्र पाल धवन आहे. त्याला एक बहीण आहे, ज्यांचे नाव श्रेष्ठा आहे. त्याची पत्नी आयशा एक ऑस्ट्रेलियन नागरिक आहे, जी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांचे लग्न झाले.  

भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवनने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तारक सिन्हा असे त्याच्या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्याने सुरुवातीचे क्रिकेट प्रशिक्षण आपल्या प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली सोनेट क्लबमध्ये केले. अकादमीमध्ये सुरुवातीला शिखरने यष्टीरक्षण केले. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याची निवड भारताच्या १७ वर्षाखालील संघाकडून २०००-०१ मध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठीझाली. त्याने तीन सामने खेळत सरासरी ८५ धावा केल्या. २००१-०२ साली विजय मर्चेट ट्रॉफीमध्ये शिखरची बॅट पुन्हा बरसली आणि त्याने ५ सामन्यांमध्ये ७०. ५० च्या सरासरीने २८२ धावा केल्या.

ऑक्टोबर २००२ मध्ये कूच बिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या १९ वर्षाखालील संघामध्ये शिखरची निवड झाली. त्यामध्ये शिखरने तेजस्वी कामगिरीची पुनरावृत्ती करत ८ सामन्यांमध्ये ५५. ४२ सरासरीने ३८८ धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर विनू मांकड ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळतांना त्याने रोहतक येथे पूर्व विभागाविरुद्ध ७१ धावा केल्या. फेब्रुवारी २००३ मध्ये सी.के. नायडू ट्रॉफीमध्ये त्याची धावांची सरासरी ५५ होती. कूच बिहार ट्रॉफीमध्ये ६ सामन्यांमध्ये ७४ धावांच्या सरासरीने ४४४ धावा केल्यावर दिल्ली १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार शिखरला घोषित करण्यात आले.२००४ मध्ये १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय चषकामध्ये शिखर धवन आघाडीच्या फलंदाजीपैकी होता. एका स्पर्धेमध्ये सात डावांमध्ये ५०५ धावा हा शिखरचा विक्रम कुणीही मोडला नाही.

शिखर धवनबद्दल महत्वाची माहिती

  • खरे नाव – शिखर धवन

  • टोपणनाव – गब्बर

  • व्यवसाय – भारतीय क्रिकेटपटू

  • वाढदिवस – ५ डिसेंबर १९८५

  • जन्मस्थान – दिल्ली, भारत

  • राशीचे नाव – धनु

  • धर्म – हिंदू

  • राष्ट्रीयत्व – भारतीय

  • पत्ता – दिल्ली आणि मेलबर्नमध्ये बंगला

  • छंद – योग, पोहणे, टेबल टेनिस व बॅडमिंटन खेळणे, वाचन

  • खाण्याची सवय – मांसाहारी

  • शाळा – सेंट मार्क्स सीनियर सेकंडरी पब्लिक स्कूल, दिल्ली

  • शैक्षणिक पात्रता – बारावी पास

  • क्रिकेटर्स – क्रिकेटर्स

  • क्रिकेट मैदान – लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन

  • अन्न – बटर चिकन

  • पेय – वोडका

  • अभिनेता – आमिर खान, सिल्वेस्टर स्टैलोन

  • अभिनेत्री – करीना कपूर

  • चित्रपट – रॉकी

शिखर धवनची आजपर्यंतची धावसंख्या

  • कसोटी - 2315 धावा @ 40.61

  • एकदिवसीय - 44.81 @ 6782 धावा

  • T20Is - 1759 धावा @ 27.92

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी