क्रीडा

IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहितच्या १० वर्षांच्या कारकिर्दीला विराम

Published by : shweta walge

मुंबई इंडियन्सनं शुक्रवारी अष्टपैलू हार्दिक पांड्याला आयपीएल २०२४ साठी कर्णधार म्हणून घोषित केलं. मुंबईनं शुक्रवारी अष्टपैलू हार्दिक पांड्याला इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या हंगामासाठी कर्णधार म्हणून घोषित केलं. आता हार्दिक रोहित शर्माच्या जागी संघाचं नेतृत्व करेल.

 मुंबई इंडियन्सनं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याची घोषणा केली. संघाचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स महेला जयवर्धने यांनी सांगितलं की, आम्ही भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला आणि रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली. रोहित शर्मानं १५८ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. ज्यामध्ये संघानं ८७ सामने जिंकले, तर ६७ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ४ सामने बरोबरीत सुटले.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आयपीएलच्या आगामी 17 व्या मोसमाकडे लागलं आहे. या 17 व्या मोसमाआधी येत्या 19 डिसेंबरला मंगळवारी ऑक्शन पार पडणार आहे. या ऑक्शनचं आयोजन हे दुबईत करण्यात आलं आहे. या ऑक्शनमध्ये 77 जागांसाठी 333 खेळाडू मैदानात आहेत. ऑक्शनआधी केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सने कॅप्टन बदलला. श्रेयस अय्यर याच्याकडे पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नितीश राणा याला उपकर्णधारपदाची सूत्र देण्यात आली. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला आहे.

हार्दिकनं यापूर्वी गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलंय. त्यानं संघाला दोनदा अंतिम फेरीत नेलं. त्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ २०२२ मध्ये आपल्या पहिल्या हंगामातच चॅम्पियन बनला. तर २०२३ मध्ये गुजरात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध फायनल हरला होता. हार्दिक पांड्या गेल्या महिन्यात गुजरातमधून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता. मुंबईनं त्याला ट्रेडच्या माध्यमातून आपल्या संघात शामील केलं. गुजरातमध्ये जाण्यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचाच भाग होता. मुंबईकडून त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन केला मंजूर

'Gulabi Sadi' in Pakistan : 'गुलाबी साडी' गाण्याची पाकिस्तानमध्ये सुद्धा क्रेझ, व्हिडीओ होतोय व्हायरल

Air India Express कर्मचाऱ्यांचा संप मागे कर्मचाऱ्यांचा संप मागे, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फीही रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार, उद्धव ठाकरे यांना ऑफर; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महायुतीसोबत जाण्याची PM मोदींची ऑफर स्विकारणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले; "त्यांच्या राजकीय विचारांसोबत..."