Ind Vs Sa 2022 T 20
Ind Vs Sa 2022 T 20 Team Lokshahi
क्रीडा

T-20 : आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात

Published by : shamal ghanekar

मागील दोन महिने आयपीएल सामन्यामध्ये व्यस्त असलेली भारतीय संघ पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. आंतरराष्ट्रीय टी 20 (T20) सामने 9 जूनपासून भारत (India) विरूद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) अशी लढत असणार आहे. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ नवी दिल्ली येथे पोहचला आहे. मायदेशामध्ये होणाऱ्या टी- 20 सामन्यासाठी भारताच्या सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली असून युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाची जबाबदारी के एल राहूलवर सोपवली आहे.

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका हा पहिला सामना दिल्लीमधील (Delhi) अरूण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळला जाणार आहे. भारतीय संघाने सलग 12 टी 20 सामने जिंकण्याचा विजय मिळवला असून आता परत टी 20 सामना जिंकून एक खास विक्रम आपल्या नावावर करता येणार आहे.

भारतीय संघाने अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.

"मोदी तुम्ही माझ्याशी लढा, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर..."; उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिला इशारा

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याआधी युवराज सिंगचं मोठं विधान, म्हणाला; "विराट कोहली वर्ल्डकप मेडल..."

Daily Horoscope 10 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना अक्षय तृतीयाचा दिवस शुभ; पाहा तुमचे भविष्य