Rishabh Pant | Virat Kohli team lokshahi
क्रीडा

IND vs SA 5th T20 : क्रिकेटमध्ये 'हा' विक्रम करणारा ऋषभ पंत ठरला पहिला कर्णधार

कोहलीची आठवन काढत लोकांनी असं केलं ट्रोल

Published by : Shubham Tate

India vs South Africa Bengaluru : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणार्‍या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी ऋषभ पंतने (Rishabh Pant) नाणेफेक गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यापूर्वी पंतने खराब रेकाॅर्ड केला होता. T20I मालिकेत 5 किंवा अधिक नाणेफेक गमावणारा तो क्रिकेटमधील पहिला कर्णधार ठरला आहे. पंतने नाणेफेक गमावल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) लोकांनी विराट कोहलीची (Virat Kohli) आठवण काढून ट्रोल केले. (ind vs sa 5th t20 rishabh pant lost toss again bengaluru social media reaction)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतने सर्व नाणेफेक गमावली आहेत. द्विपक्षीय T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत 5 किंवा अधिक नाणेफेक गमावणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. पंतने नाणेफेक गमावल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल केले आहे. पंतसोबत विराट कोहलीचीही आठवण झाली.

विशेष म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरीत आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन सामने जिंकले. यानंतर भारताने फासे वळवले आणि तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 मध्ये शानदार विजय मिळवला. राजकोट T20 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?