India vs Sri Lanka 2nd T20 Team Lokshahi
क्रीडा

विजयासाठी दोन्ही संघ उतरणार मैदानात; कोणाचं पारड होणार जड?

वानखेडे मैदानावर झालेला पहिला टी 20 सामना भारताने जिंकला आहे.

Published by : shamal ghanekar

वानखेडे मैदानावर झालेला पहिला टी 20 सामना भारताने जिंकला आहे. तर आज पुण्यात दुसरा टी 20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करताना दिसत आहे. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. तर आता दुसरा टी 20 सामना कोण जिंकणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

तर पहिल्या टी 20 सामन्यामध्ये संजू सॅमसनला दुखापत झाली होती. त्यामुळे तो हा दुसरा टी 20 सामन्यास मुकणार आहे. तर तो अजून तंदुरुस्त नसल्यामुळे भारतीय संघात नवीन बदल होण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह दुखापतीमुळे पहिल्या टी 20 सामना मुकला होता. तो तंदुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे, तर संघात कुणाचा समावेश होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दुसऱ्या टी-20 सामन्यांसाठी दोन्ही संघ:

भारतीय संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.

श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."