IND vs SL U19 Asia Cup 
क्रीडा

IND vs SL U19 Asia Cup : सेमी फायनलसाठी टीम इंडियाची जय्यत तयारी; श्रीलंकेशी रंगणार थरारक सामना, जाणून घ्या A To Z माहिती

Semi Final Clash: अंडर-१९ आशिया कप २०२५ च्या उपांत्य फेरीत आज भारत आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी करण्यासाठी खाली स्क्रोल करा...

अंडर-१९ आशिया कप २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपले असून, आता उपांत्य फेरीत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार संघांची चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही उपांत्य सामने आज, १९ डिसेंबर रोजी दुबईतील आयसीसी अकादमी ग्राउंडवर होणार असून, पहिल्या सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंका आमनेसामने येतील. आयुष म्हात्रे कर्णधारपद सांभाळणाऱ्या भारतीय संघाला श्रीलंकेच्या विमथ दिनसराकडून कडवी टक्कर अपेक्षित आहे.

टीम इंडिया-श्रीलंका लढत सकाळी १०.३० वाजता

भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता टॉस होईल आणि १० वाजून ३० मिनिटांनी सामना सुरू होईल. हा थ्रिलिंग सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल, तर मोबाईलवर सोनी लिव्ह अॅपद्वारे लाईव्ह प्रसारण उपलब्ध असेल. टीम इंडियाच्या वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या स्टार जोडीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. वैभवने स्पर्धेत धमाकेदार फटकेबाजी करून चाहत्यांना आनंद दिला असून, उपांत्यताही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. आयुषनेही जबरदस्त नेतृत्व करत वैभवला चांगली साथ दिली आहे.

पाकिस्तान-बांगलादेश सामन्याला एकाच वेळी सुरुवात

दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील लढतही भारतीय वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. साखळी फेरीत चांगली कामगिरी करणाऱ्या या संघांमधील स्पर्धा तितकीच रोमांचक असण्याची शक्यता आहे. उपांत्य फेरीत विजयी होणारे दोन संघ अंतिम फेरीत धडक देणार असल्याने क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. स्टार स्पोर्ट्सवरून या सामन्यांचे प्रसारण होईल आणि चाहते घरी बसून मजा घेऊ शकतील. या स्पर्धेत भारतीय तरुण खेळाडूंच्या भविष्यकाळातील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे, तर पाक-बांगलादेश सामन्यातही धडाधडा अपेक्षित आहे.

  • भारत विरुद्ध श्रीलंका उपांत्य सामना आज दुबईत

  • सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होणार

  • सोनी स्पोर्ट्स व सोनी लिव्हवर थेट प्रसारण

  • विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा