क्रीडा

IND vs ENG : लॉर्ड्स मैदानावर भारत आज खेळणार खास लढत; जाणून घ्या वेळ

आज भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरी वनडे लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. आजची लढत भारतीय संघासाठी खास असणार आहे. भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरी मॅच जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताने १० विकेटनी दणदणीत विजय मिळवला होता. आता दुसऱ्या लढतीत तशीच कामगिरी करण्याची टीम इंडियाची तयारी आहे.

Published by : Siddhi Naringrekar

आज भारत आणि इंग्लंड ( IND vs ENG) यांच्यात आज दुसरी वनडे लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. आजची लढत भारतीय संघासाठी खास असणार आहे. भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरी मॅच जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताने १० विकेटनी दणदणीत विजय मिळवला होता. आता दुसऱ्या लढतीत तशीच कामगिरी करण्याची टीम इंडियाची तयारी आहे.

जर आज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला तर वनडे, टी-२० आणि कसोटी मिळून भारताचा इंग्लंडविरुद्धचा १००वा विजय ठरले. पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी यांना या मैदानावर फायदा होऊ शकतो.

वनडे खेळाला दुपारी ३.३० वाजता सुरूवात होईल आणि त्याचा टॉस ३ वाजता होईल. विराटला (Virat Kohli) झालेल्या दुखापतीबद्दल अपडेट आलेली नाही. त्यामुळे तो दुसरी वनडे देखील खेळणार नसल्याचे मानले जाते आहे. अशात श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा