क्रीडा

टीम इंडियाचा बांग्लादेशवर 'विराट' विजय

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : बांग्लादेशविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने सात विकेट राखून विजय मिळवला. यानुसार भारताने लागोपाठ चार सामने जिंकत वर्ल्डकपमध्ये विजयी चौकार लगावला आहे. तसेच, पॉइंट टेबलमध्ये भारत पहिल्या स्थानावर आला आहे. भारतासाठी आता उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे.

बांगलादेशच्या 257 धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात केली. परंतु, रोहित शर्मा 40 चेंडूत 48 धावांची खेळी खेळून बाद झाला. तर, रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीने बांगलादेशविरोधात आघाडी उघडली आहे. शुभमन गिलने 52 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, गिल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले. अय्यर 19 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने शतक पूर्ण करुन भारताला विजय मिळवून दिला आहे.

तत्पुर्वी जसप्रीत बुमराहच्या झंझावाती गोलंदाजीमुळे बांगलादेशला शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याची संधी मिळाली नाही. भारताने शानदार पुनरागमन केले आहे. बुमराहने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. सिराज आणि जडेजानेही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमावून 256 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन आणि लिटनने अर्धशतके झळकावली.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा तातडीचा नाशिक दौरा,हेमंत गोडसेंसाठी शिंदे मैदानात

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Rain Updates: हवामान विभागाचा इशारा; पुढील 7 दिवस 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अर्लट

MI VS KKR: मुंबई इंडियन्सची पुन्हा एकदा पराभव; कोलकाताचा 18 धावांनी विजय, KKR प्लेऑफसाठी पात्र

लोकसभेत का जायचंय? बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाल्या; "खासदार झाल्यावर..."