IPL Team Lokshahi
क्रीडा

‘मुंबई इंडियन्स’ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर

Published by : Saurabh Gondhali

मुंबई इंडियन्सचा(Mumbai Indians) संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 11 मॅच खेळणाऱ्या मुंबई संघाला यंदा केवळ 2 मॅचवर कब्जा मिळवता आला आहे. काल झालेल्या सामन्यात मुंबईने चैन्नईचा 5 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर रोहित शर्माने ( Rohit Sharma) तिलक वर्मा (Tilak Varma) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तर टीम इंडियाच्या माजी दिग्गज क्रिकेटरने19 वर्षीय युवा खेळाडू तिलक लवकरच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होणार असल्याचे म्हटले आहे.

सीएसकेवर विजय मिळवल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने तिलक वर्मा लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसेल. कठीण परिस्थितीत त्याने चांगली कामगिरी केली. इतक शांतपणे खेळण अवघड आहे. तो सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे. त्याच्याकडे चांगले प्रदर्शन करण्याची ताकद आहे. माझ्या मते तो योग्य मार्गावर आहे. आमच्या सर्वांचे लक्ष त्याच्या खेळावर आहे. असे मत रोहितने यावेळी व्यक्त केले.

मुंबई इंडियन्स आतापर्यंत पाच वेळा आयपीएलची विजेती टीम राहिली आहे. यंदा त्यांच्या वर प्ले ऑफ मधूनच बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. त्यांच्या संघाचा परफॉर्मन्स हा अत्यंत खराब राहिला आहे पुढील वर्षी रोहित शर्मा हा कर्णधार राहणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा