Emerging AsiaCup Team Lokshahi
क्रीडा

इमर्जिंग आशिया चषकावर पाकिस्तानने कोरलं नाव, तब्बल इतक्या धावांनी भारताचा पराभव

इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेवर पाकिस्तान अ संघाने कोरले नाव..

Published by : Sagar Pradhan

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये प्रेमदासा स्टेडियमवर पुरुषांच्या इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत अ संघाचा पाकिस्तान अ संघाशी सामना पार पडला. या अंतिम सामन्यात पाकिस्ताने भारताचा पराभव करत इमर्जिंग आशिया चषकावर आपले नाव कोरलं आहे. पाकिस्तानने भारतीय संघाचा तब्बल १२८ धावांनी दारूण पराभव केला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हाच निर्णय पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरला. पाकिस्तान अ संघाने ५० षटकांत ८ बाद ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत अ संघाचा डाव २२४ धावांवर आटोपला. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले.

भारतीय संघ: यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, आरएस हंगरगेकर आणि युवराजसिंह डोडिया.

पाकिस्तान संघ: मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MNC-Congress : मनसे-ठाकरे युतीवर काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका; महाविकास आघाडीत सामील होणार का?

Bilawal Bhutto's Threat To India : "...तर पाकिस्तानची युद्धासाठी सज्ज होईल" भारताच्या 'त्या' निर्णयाने पाकिस्तान संतप्त; बिलावल भुट्टोंची भारताला धमकी

Latest Marathi News Update live : आमदार जितेंद्र आव्हाड तुळजापूरमध्ये दाखल

Police Recruitment : पोलिस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर! आता होणार 'इतक्या' पदाची भरती