Pak vs NZ semifinal 2022  Team Lokshahi
क्रीडा

T20 World Cup: पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध पाकिस्तान आमने-सामने; कोण मारणार बाजी?

टी 20 वर्ल्डचा आज पहिला सेमी फायनल सामना सिडनीच्या मैदानात आज म्हणजे 9 नोव्हेंबर बुधवारी खेळला जाणार आहे. हा पहिली सेमी फायनल सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा खेळला जाणार आहे.

Published by : shamal ghanekar

टी 20 वर्ल्डचा आज पहिला सेमी फायनल सामना सिडनीच्या मैदानात आज म्हणजे 9 नोव्हेंबर बुधवारी खेळला जाणार आहे. हा पहिला सेमी फायनल सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा खेळला जाणार आहे. यावेळी पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) आमने- सामने असणार आहेत. आणि हा सामना खूपच रंगतदार होणार आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये कोण जिंकणार याकडे आता क्रिडाप्रेमींचेही लक्ष लागले आहे. याआधी पाकिस्तान सहाव्यांदा सेमी फायनलच्या स्पर्धेची पोचली होती. मात्र न्यूझीलंड स्पर्धेच्या फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा जाण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार बाबर आझम आणि केन विल्यमसन कोणती चाल चालणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याला टी 20 वर्ल्डमध्ये साजेशी कामगिरी करता आली नाही. या पाच सामन्यांमध्ये बाबरने केवळ ३९ धावा केल्या आहेत. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार बाबर आझम बॅटिंग लाईनअपमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. या सामन्यावेळी बाबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला करण्यासाठी येऊ शकतो. त्यामुळे मिडल ऑर्डर मजबूत होऊ शकते. तसेच या सामन्यामध्ये मधल्या फळीमधील खेळाडू शान मसून, इफ्तिकार अहमद आणि युवा मोहम्मद हॅरिस यांचे योगदान महत्त्वाचे असणे गरजेचे आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला या सामन्यामध्ये वेगळी रणनीती आखणे गरजेचे आहे. तसेच कर्णधार केन विल्यम्सनने अखेरच्या दोन सामन्यामध्ये म्हणजेच इंग्लंडविरुद्ध ४० धावा आणि आर्यलडविरुद्ध ६१ धावांची खेळी करता आली आहे. तर न्यूझीलंड खेळाडू ग्लेन फिलिप्स याने टी 20 वर्ल्डमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक लागावले होते. त्यामुळे या सामन्यामध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. तर सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे आणि फिन अ‍ॅलन यांनीही चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. न्यूझीलंड संघातील फिरकीपटू मिचेल सँटनर आणि इश सोधी आणि ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी आणि लॉकी फग्र्युसन वेगवान गोलंदाज यांच्यावर विशेष कामगिरी करणे अपेक्षित आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?