prithvi shaw
prithvi shaw Team Lokshahi
क्रीडा

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर ‘पृथ्वी शॉ’ रुग्णालयात

Published by : Saurabh Gondhali

आयपीएलमध्ये 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळला गेला. सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी विजय मिळवला. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना जिंकणे दिल्लीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का बसला होता. DC चा सलामीवीर पृथ्वी शॉ (prithvi shaw)सामन्यातून बाहेर पडल्यानंतर रुग्णालयात पोहोचला आहे. त्यानंतर त्यांनी एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केला.

आयपीएलचा IPL 2022 हा हंगाम पृथ्वी शॉसाठी खूप चांगला चालू आहे. त्याने 9 सामन्यात 160 च्या स्ट्राईक रेटने 259 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने दोन अर्धशतकेही केली आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामनातही प्रकृती अस्वास्थ्यामुळे पृथ्वी शॉ मुकला होता आणि काल चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातूनही तो बाहेर होता.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलर कोरोना पॉझिटिव्ह (Net Bowler Testing Covid Positive) आला होता. बीसीसीआयने आयपीएल 2022 साठी बनवलेल्या कोरोना प्रोटोकॉलनुसार, दिल्ली कॅपिटल्सला कोरोना चाचणीच्या दुसर्‍या फेरीतून जावे लागेल आणि तोपर्यंत सर्व खेळाडू खोल्यांमध्ये एकटे-एकटे राहतील. एप्रिलच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शची कोविड-19 साठी दुसरी RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल