Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Team Lokshahi
क्रीडा

दुखापतीमुळे रविंद्र जडेजा मुकणार एकदिवसीय सामना, 'या' खेळाडूला करणार संघात सामील

Published by : shamal ghanekar

सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून या सामन्यानंतर लगेच भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान भारतीय संघ बांगलादेशविरूद्ध तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. तसेच बांगलादेशविरूद्ध सामन्यासाठी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संघात सामील करण्यात आले होते. मात्र, आता एक माहिती समोर येत आहे की, जडेजाची दुखापत कायम असून तो एकदिवसीय सामने खेळणार नसल्याचे समजत आहे.

आशिया कप खेळत असताना जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यातही आली होती. त्यानंतर तो रिकव्हरही होत होता. त्यानंतर त्याला बांगलादेशविरुद्ध सामन्यासाठी त्या संघात सामीलही करण्यात आले होते. पण मात्र त्याची दुखापत पूर्णपणे बरी न झाल्यामुळे तो एकदिवसीय सामन्यांना मुकणार आहे.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या जागी फिरकीपटू युवा शाहबाज अहमदचं (Shahbaz ahmad) खेळणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच संघामध्ये अजून दुसऱ्या कोणत्या खेळाडूचा नाव सामील होईल हे पाहणे आवश्यक आहे. तसेच चांगल्या फॉर्मामध्ये असलेला भारतीय संघातील सूर्यकुमार यादवचे नावही या दौऱ्यामध्ये सामील करण्यात आले नाही.

बांगलादेशविरूद्ध वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे :

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि कुलदीप सेन.

'अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील' अजितदादांच धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांची खरमरीत टीका

'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठिशी' प्रकाश शेंडगे यांची टीका

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता