क्रीडा

रोहित शर्मानं रचला 'हा' विक्रम; सचिन तेंडुलकर, कपिल देवला टाकलं मागे

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आणखी एक इतिहास रचला आहे. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारा रोहित शर्मा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भारतीय कर्णधार रोहित शर्माने आणखी एक इतिहास रचला आहे. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणारा रोहित शर्मा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. याबाबत त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. तसेच, रोहित विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करणारा संयुक्त पहिला फलंदाज ठरला आहे.

वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. रोहित शर्माने वेगवान खेळी खेळली आहे. या सामन्यात विश्वचषकात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. यामध्ये रोहितने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. यापूर्वी भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. विश्वचषकात सचिन तेंडुलकरच्या नावावर ६ शतके आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर आता 7 शतके आहेत.

याशिवाय रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावून आणखी एक इतिहास रचला आहे. रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. याआधी, एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक ठोकण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देवने 72 चेंडूत शतक झळकावले होते, मात्र आता रोहित शर्माने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक; बच्चू कडूंची आजपासून 7/12 कोरा यात्रा

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर