IND vs WI | Shreyas Iyer | T20 team lokshahi
क्रीडा

IND vs WI : दुसऱ्या T20 सामन्यात हा अनुभवी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

सॅमसन किंवा हुडा साठी संधी

Published by : Team Lokshahi

IND vs WI : टीम इंडियाने 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 68 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. दुसरा टी-20 जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल. मात्र, यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन काही कठोर निर्णय घेऊ शकते आणि काही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागू शकते. प्लेइंग इलेव्हनमध्ये ज्या खेळाडूचे स्थान धोक्यात आले आहे तो म्हणजे 'श्रेयस अय्यर'. भारतीय संघ व्यवस्थापन दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी संजू सॅमसन किंवा दीपक हुडाला संधी देऊ शकतात. (sanju samson or deepak hooda can replace shreyas iyer)

फलंदाजी हे कारण असेल

श्रेयस अय्यरला दुसऱ्या T20 मधून वगळण्यात आले तर त्याचे मोठे कारण म्हणजे त्याची संथ फलंदाजी आणि चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू न शकणे. श्रेयस अय्यरची सुरुवात चांगली होत असली तरी तो त्याच्या डावाचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू शकला नाही. स्वतः ही वस्तुस्थिती मान्य केली होती. विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही आपण पाहिले की तीनही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात आणि वेळ असूनही त्याला शतक करता आले नाही आणि श्रेयस वेगवान फलंदाजी करू शकत नाही. आणि दुसऱ्या T20 मधून बाहेर पडण्याचे हे कारण देखील असू शकते. मागील सामन्यात श्रेयस शून्यावर बाद झाला होता.

सॅमसन किंवा हुडा साठी संधी

श्रेयस अय्यरच्या जागी संजू सॅमसन किंवा दीपक हुडाला भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकते. हे दोन्ही फलंदाज त्यांच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात आणि चांगले संपर्कात आहेत. दीपक हुडाने आयर्लंडविरुद्ध टी-२० मध्ये शतक झळकावले होते, तर संजू सॅमसननेही याच सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे टी-20 क्रिकेट आणि वेस्ट इंडिज संघाची हिटिंग क्षमता लक्षात घेता, दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयसच्या जागी संजू सॅमसन किंवा दीपक हुडा यांचा समावेश केला जाऊ शकतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप