SHUBMAN GILL MAKES COMEBACK IN VIJAY HAZARE TROPHY AFTER T20 WORLD CUP DROPOUT 
क्रीडा

Shubman Gill: वर्ल्ड कप संघातून वगळलं, पण 48 तासांतच नव्या मैदानात संधी; विजय हजारे ट्रॉफीत शुबमन गिलची पुनरागमनाची तयारी

Vijay Hazare Trophy: टी-20 वर्ल्ड कप संघातून वगळल्यानंतर शुबमन गिलला विजय हजारे ट्रॉफीत पंजाब संघात संधी मिळाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा होताच उपकर्णधार शुबमन गिलला संघातून डच्चू देण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आलं. सातत्याचा अभाव आणि अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे निवड समितीने हा कठोर निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. मात्र वर्ल्ड कप संघातून बाहेर पडताच अवघ्या 48 तासांत शुबमन गिलला पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) विजय हजारे ट्रॉफी 2025 साठी जाहीर केलेल्या संघात शुबमन गिलचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे या संघात टीम इंडियातील दोन अन्य स्टार खेळाडू अर्शदीप सिंह आणि अभिषेक शर्मा यांनाही स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधील निराशेनंतर शुबमनसाठी ही स्पर्धा स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची मोठी संधी मानली जात आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये शुबमन गिलला धावांसाठी संघर्ष करावा लागला. संधी मिळूनही अपेक्षित प्रभाव टाकता न आल्याने अखेर त्याला वर्ल्ड कप संघाबाहेर जावं लागलं. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून निवडकर्त्यांचं लक्ष वेधण्याचा मार्ग अजून खुला आहे. विजय हजारे ट्रॉफी त्याच दृष्टीने शुबमनसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

पंजाब संघ आपला पहिला सामना 24 डिसेंबर रोजी महाराष्ट्राविरुद्ध खेळणार आहे. सध्या पंजाबचा कर्णधार कोण असेल, याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या ग्रुपमध्ये पंजाबसोबत महाराष्ट्र, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आणि मुंबई हे संघ आहेत. साखळी सामने 8 जानेवारीपर्यंत चालणार आहेत.

शुबमन गिल, अर्शदीप सिंह आणि अभिषेक शर्मा या तिघांच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. वर्ल्ड कपच्या निराशेनंतर देशांतर्गत मैदानावर चमकदार पुनरागमन करून शुबमन गिल काय संदेश देतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • शुबमन गिलला टी-20 वर्ल्ड कप 2026 संघातून वगळले.

  • 48 तासांत विजय हजारे ट्रॉफीत पंजाब संघात संधी मिळाली.

  • अर्शदीप सिंह आणि अभिषेक शर्मा देखील संघात समाविष्ट.

  • देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून पुनरागमनाची संधी.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा