Andy Roberts
Andy Roberts Team Lokshahi
क्रीडा

Andy Roberts : 'भारतीय क्रिकेटपटूंना अहंकार चढलाय' वेस्ट इंडीजच्या माजी खेळाडूचे विधान

Published by : Sagar Pradhan

नुकताच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. त्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या माजी दिग्गज किक्रेटपटू अंडी रॉबर्टस् यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंना अहंकार चढला आहे. अशा शब्दात त्यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला फटकारले आहे.

काय म्हणाले अंडी रॉबर्टस?

भारतीय संघावर बोलताना रॉबर्टस् म्हणाले की, 'भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना अहंकार चढला आहे. यामुळे ते जगातील इतर संघांना कमी लेखत आहेत. भारतीय संघाला लक्ष केंद्रीत करावे लागेल. टेस्ट क्रिकेट की टी-20 क्रिकेट यामधील एक ठरवावे लागेल. टी20 क्रिकेट सुरुच राहिल. त्यासाठी स्पर्धा नाही.' असा सल्ला त्यांनी दिला.

पुढे ते म्हणाले की, 'भारताकडे काही चांगले खेळाडू आहेत, परंतु त्यांना देशाबाहेर खेळायला मिळाले नाही. मला अपेक्षा होती की भारताने त्यांचे फलंदाजीतील काम दाखवावे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीच्या अंतिम फेरीत मला कोणतेहा चांगला खेळ दिसला नाही. अजिंक्य रहाणे चांगला खेळला असला तरी त्याच्या हाताला दुखापत झाली. शुभमन गिल जेव्हा ते शॉट्स खेळतो तेव्हा तो चांगला खेळतो. पण तो लेग स्टंपवर उभा राहतो आणि अनेकदा चेंडू स्टम्पवर टाकला जातो किंवा विकेटच्या मागे त्याचा झेल घेतला जातो.' असे ते म्हणाले.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...