Damini App | Buldana farmer Team lokshahi
तंत्रज्ञान

बुलडाण्यात शेतकऱ्यावर कोसळली वीज, तहसीलदारांचे दामिनी ॲप वापरण्याचे आवाहन

शेतकऱ्याची प्रकृती स्थिर

Published by : Shubham Tate

Damini App : बुलडाणा (Buldana) तालुक्यात आज 19 जूनला दुपारच्या सुमारास अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी बुलडाणा शहरापासून अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कोलवड परिसरात देखील जोरदार विजांचा (lightning) गडगडाट सुरू होता. कोलवड येथील राजेश शेषराव जाधव हे शेतात काम करत असताना दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले आहेत. (damini app for early warning of lightning alert Buldana tehsildar)

त्यांना नातेवाइकांनी तात्काळ बुलडाणा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सद्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे. विजांपासुन सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी दामिनी ॲपचा वापर करावा असे आवाहन देखील तहसीलदार खंडारे यांनी केले आहे.

दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत होते. विशेषतः शेतकरी, मेंढपाळ यांना शेतात, जंगलात उघड्यावर वीज, वारा यांचा सामना करावा लागतो. आता भारत सरकारच्या भू विज्ञान मंत्रालयाने एक मोबाईल अॅप आणलं आहे. 'दामिनी अॅप' (Damini App) असे या नवीन अॅपचे नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला आता वीज पडण्याची पूर्वसूचना मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य