Indian Railway |IRCTC | Insurance cover Team Lokshahi
तंत्रज्ञान

IRCTC : तिकीट बुक करताना तुम्हाला फक्त एका क्लिकवर मिळणार 10 लाखांचा लाभ

प्रवाशाला केवळ 35 पैसे गुंतवावे लागणार

Published by : Shubham Tate

Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अतिशय फायद्याची आहे. कारण रेल्वेने प्रवाशांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची योजना सुरू केली आहे. यासाठी संबंधित प्रवाशाला केवळ 35 पैसे गुंतवावे लागणार आहेत. तुम्हाला ही सेवा तिकीट बुक करतानाच मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त Insurance Curve च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मोबाईल अॅपद्वारे तिकीट बुक करावे लागेल. तसेच, तुम्हाला 35 पैशांच्या गुंतवणूक पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला 10 लाखांचे विमा संरक्षण मिळेल. (irctc just one click will make life while booking tickets you will get the benefit)

  • PNR अंतर्गत बुक केलेल्या सर्व प्रवाशांसाठी प्रवास विमा लागू होईल. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भारतीय नागरिकांनी IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक केले आहे तेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मानले जातील. IRCTC वेबसाइटनुसार, विमा पॉलिसीमध्ये 'मृत्यू, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व, प्रवास करताना मृतदेहांच्या वाहतुकीसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च' यासह सर्वकाही समाविष्ट आहे. यासाठी तुम्हाला 10 लाख रुपयांचे कव्हर मिळेल. यामध्ये, कायमस्वरूपी आणि आंशिक अपंगत्वासाठी ₹ 7.5 लाख कव्हरेज दिला जाईल.

10 लाखांच्या विमा संरक्षणाच्या सुविधेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC च्या वेबसाइटला भेट देऊ शकता. तसेच, तुम्ही स्टेशनवर जाऊन कर्मचाऱ्यांचा सल्ला घेऊ शकता. यामागे प्रवाशांना सुरक्षा देण्याबरोबरच मोबाइल अॅपचा प्रचार करणे हाही रेल्वेचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी