तंत्रज्ञान

गुगल ट्रांसलेटमध्ये आता या नवीन भाषांचा समावेश

कोकणी, मैथिली, मिझोसह आठ नवीन भाषांचा समावेश

Published by : Saurabh Gondhali

भाषांतर ( Translation ) करण्यासंदर्भात गुगलने( Google ) एक मोठे अपडेट ( Update ) जारी केले आहे. तुम्ही गुगलवर आता संस्कृत आणि भोजपुरीमध्ये देखील भाषांतर करू शकता. गुगल ट्रान्सलेटमध्ये नवीन अपडेटनंतर संस्कृत( Sanskrit) आणि भोजपुरीसह आठ नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत.

गुगलमध्ये नवीन अपडेटनंतर तुम्हाला संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येईल. गुगल ट्रान्सलेटवर उपलब्ध असलेल्या एकूण भारतीय भाषांची संख्या आता १९ वर गेली आहे. तर जगभरातील एकूण १३३ भाषांमध्ये आता भाषांतर करता येणार आहे. गुगलने ही घोषणा त्यांच्या वार्षिक परिषदेत केली आहे. आपल्या ऑनलाइन भाषांतर प्लॅटफॉर्मवर सतत अनेक प्रादेशिक भाषा जोडत आहे.

ईशान्य भारतातील सुमारे २५ दशलक्ष लोक आसामी भाषा वापरतात. सुमारे ५० दशलक्ष लोक भोजपुरी वापरतात. मध्य भारतातील सुमारे २० दशलक्ष लोक कोंकणी वापरतात. एका खास मुलाखतीत इकोनॉमिक्स टाईम्सला गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, आयझॅक कॅसवेल यांनी सांगितले की, गुगल भाषांतरात संस्कृत ही प्रथम क्रमांकाची आणि सर्वाधिक विनंती केलेली भाषा आहे आणि आता आम्ही ती जोडत आहोत. आम्ही प्रथमच ईशान्य भारतातील भाषांना जोडत आहोत.

भारतातील भाषांशी संबंधित भारतीय राज्यघटनेची आठवी अनुसूची असून या अनुसूचीमध्ये २२ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु गुगलच्या नवीनतम अपडेटमध्ये भारतातील सर्व २२ अनुसूचित भाषांचा समावेश नाही. याबाबत कॅसवेल यांनी सांगितले की, अनुसूचित भाषांमधील ही तफावत कमी करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

Latest Marathi News Update live : जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

IND vs ENG Mohammed Siraj : डीएसपी सिराजचा अनोखा पराक्रम! सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मागे टाकत केली ऐतिहासिक कामगिरी

Red Soil Story : कोकणातील 'त्या' युट्यूबरचे निधन, स्टोरी टाकत दिली माहिती