WhatsApp Team Lokshahi
तंत्रज्ञान

इंटरनेटशिवाय वापरता येणार WhatsApp; कसे ते जाणून घ्या..

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग अ‍ॅपवर आता युजर्सना इंटरनेटशिवायही चॅटिंग करता येणार आहे. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने जगभरातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्स इंटरनेटशिवायही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकणार आहेत.

Published by : shamal ghanekar

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग अ‍ॅपवर आता युजर्सना इंटरनेटशिवायही चॅटिंग करता येणार आहे. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने जगभरातील व्हॉट्सअ‍ॅप युजर्स इंटरनेटशिवायही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकणार आहेत. ज्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांच्या जिवलग व्यक्तींपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रॉक्सी फीचर आणले आहे. मेटाकडून व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फीचर आणण्यात आले असून जगभरातील युजर्ससाठी पॉक्सी सपोर्ट सुरू करण्यात आला आहे. यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपवर इंटरनेटशिवायही चॅटिंग करणे सोपे होणार आहे.

ज्यांना इंटरनेट बंद असल्याने त्यांच्या जिवलग व्यक्तींपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रॉक्सी फीचर्स आणले आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे इंटरनेट ब्लॉक झाल्यावर प्रॉक्सी सर्व्हरद्वारे कनेक्ट राहण्याचे फीचर्स रोलआऊट करीत आहे. जगभरातील वॉलंटियर्स आणि ऑर्गेनायजेशन्सच्या प्रॉक्सी सर्व्हर सेटअपद्वारे व्हॉट्सअ‍ॅप युजर्स कनेक्ट राहतील. प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट असतानाही युजर्सची गोपनीयता आणि सुरक्षा मिळत राहील. असे त्यांनी म्हटले आहे.

इंटरनेटशिवायही व्हाट्सएप प्रॉक्सी फीचर्स वापरण्याची टीप्स :

  • सर्वात प्रथम तुम्ही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून घ्या. त्यानंतर पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप ओपन घ्या.

  • व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यानंतर त्याच्या उजव्या कोपर्‍यात 3 डॉट्सवर क्लिक करा.

  • आता सेटिंग्ज वर क्लिक करून स्टोरेज आणि डेटा वर क्लिक करा.

  • यानंतर पुढे शेवटला प्रॉक्सी ऑप्शनवर क्लिक करून आता "सेट अप प्रॉक्सी" वर क्लिक करा.

  • आणि प्रॉक्सी पत्ता प्रविष्ट करून त्यानंतर 'सेव्ह' पर्यायावर क्लिक करा.

  • आता तुम्हाला प्रॉक्सी पर्याय हिरव्या रंगाचा दिसत असेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा