महायुतीच्या शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सांंगितलं जात आहे. तसेच महायुतीच्या खातेवाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोणाला कोणतं खातं मिळणार? कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी LOKशाही मराठीच्या हाती लागली आहे. रवींद्र चव्हाण, नितेश राणे, गणेश नाईकांना मंत्रिपद? मिळणार असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे, गोपीचंद पडळकरांची वर्णी? लागण्याची शक्यता आहे. मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटीलही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.