ठाणे रायगड जिल्ह्यातील जमीनी बळकावण्याच्या षडयंत्र सुरु असून भूमिपूत्रांना त्यांच्या जमिनीतच उपरे ठरवण्याच्या कट आखल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. अलिबागमधील जमीन परिषदेआधी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका मांडली आहे. मुंबई भूमिपूत्रांच्या हातून आता गेली आहे आणि आता ठाणे आणि रायगडमध्येही हे सुरु असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. परप्रांतीय जमीन आता हळूहळू ताब्यात घेत असून त्या जमीनी वाचवण्याचा मोठं आव्हान मराठी माणसासमोर असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.