पुण्यातल्या ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॉर्ड तयार झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वॉर्डचे उदघाटन शुक्रवारी केले आहे. यादरम्यान भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वाद झाला होता. यावर सुनील कांबळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.