काँग्रेसने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय वाद उफाळला आहे. या व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात बोलताना दिसतात, ज्या मध्ये ते म्हणतात, "आज काल फॅशन झालीये आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर. इतकं देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता." काँग्रेसने पोस्ट केलेल्या 12 सेकंदाच्या व्हिडिओवर काँग्रेस - भाजपमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.