व्हिडिओ

संजय राऊत यांनी केले नारायण राणेंचे कौतूक

Published by : Team Lokshahi

राज्यात अनेक राजकीय घडामोडी गेल्या सहा दिवसांपासून सुरु आहे. शिवसेना आणि नारायण राणे यांचा संघर्षही अनेकदा पाहण्यास मिळाला आहे. आता मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे कौतूक केले आहे. माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, मी नारायण राणे यांना मानतो. कारण ते राजीनाने देऊन बाहेर पडले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला ओपन चॅलेंज दिलं आहे. ते म्हणाले, हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् पुन्हा निवडणुकीला सामोरं जा. यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांचं मात्र कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. राऊत यांनी म्हटलं की, जे फुटले त्यांची शिवसेना नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या.

मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर ते पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे 22 लोक फुटले त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवली. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, असं आव्हान राऊत यांनी दिलं आहे.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं