केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण म्हणजे असंतुष्ट आत्म्यांचा सागर असल्याचे म्हटले आहे. नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केल. ते म्हणाले की, राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र आहे, जिथे प्रत्येकजण दु:खी आहे. नगरसेवक आमदारकीची संधी न मिळाल्याने दु:खी असतो. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार नाराज असतो. एखादा मंत्री मुख्यमंत्री होऊ शकला नाही म्हणून दुखी असतो तर, मुख्यमंत्र्याला हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते, अस ते म्हणाले. गडकरींच्या या वक्तव्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.