राज्यातील सरकार हे परसेंटेज घेऊन चाललेलं सरकार आहे. यवतमाळ जिल्ह्यात तर कमिशनबाजीचा धुमाकूळ सुरु असून पैसे दिल्याशिवाय कोणतीच कामे होत नाही. राज्यातील तीन पायांचे सरकार फक्त पैसा ओढण्यासाठी बसलेले आहे. हरियानातील चौधरी या ठेकेदाराला 700 कोटींची कामे दिल्या गेली. माती काढणे व नाला ट्रेनिंगची कामे केवळ कमिशनसाठी काढली गेली असाही आरोप माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.