व्हिडिओ

Solapur : चालक संपामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद

Published by : Team Lokshahi

ट्रक चालकांच्या संपाचा सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम जाणवतो आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आज बंद राहणार आहे. लिलाव आज बंद असल्याने सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटलेली आहे. काल उशिरा लोडींग झाल्याने कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय झालेला होता. सुदैवाने संप मागे घेतल्याची घोषणा झाल्याने उद्या बाजार मात्र सुरू राहतील. केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आले असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत तूर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा