वादग्रस्त आयएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरीटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थर्मोव्हेरीटा कंपनीने 2 लाख 72 हजारांचा कर भरला नसल्याची बातमी समोर आली आहे. तर पूजा खेडकरने थर्मोव्हेरीटा कंपनीचा पत्ता दिव्यांग प्रमाणपत्रासाठी Ycm रुग्णालयाला रेशन कार्ड मार्फत दिला होता.
प्रशासनाकडून कंपनीवर लिलावाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आधीच जप्तीची कारवाई केलेल्या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे. आता या कंपनीवर लिलावाची कारवाई होण्याची शक्यता आहे.