नवीन वर्षात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात फडणवीसांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले तसेच 11 नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केले.
याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, दुर्गम आणि माओवादग्रस्त भागात सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो.
यामुळे नक्कीच 'इज ऑफ लिव्हिंग'ला चालना मिळेल आणि आणखी प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. गडचिरोली व परिसरातील माझ्या भगिनी व बांधवांचे विशेष अभिनंदन! असे पंतप्रधान मोदी म्हणाले.