सैफ अली खान प्रकरणातली मोठी बातमी समोर आली आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ल्याचा पोलिसांकडून सीन रिक्रिएशन करण्यात आला आहे. आरोपी सैफच्या घरी कसा घुसला याबाबत तपास केला करण्यासाठी आरोपीला वांद्रे स्थानकासह सैफच्या घरी नेण्यात आले होते. या सीन रिक्रिएशनमधून पोलिसांनी गुन्ह्याची अधिक माहिती घेतली.
सैफ अली खानवर हल्ला करून आरोपी कसा पळाला? वांद्रे स्थानकापर्यंत कसा पोहचला? त्या त्या ठिकाणी पोलिस आरोपीला घेऊन गेले आणि त्याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. सैफच्या इमारतीत प्रवेश करताना आरोपी कुठल्याही कॅमेऱ्यात दिसत नाही आहे. मग तो सैफच्या घरात पोहचला कसा? याचा तपास पोलिस करत आहेत.
रात्री पोलिसांनी पुन्हा कसून तपास केला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी रात्री 11.15 वाजता बाहेर काढलं, आणि यानंतर आरोपीला सैफच्या घरी घेऊन गेले. पोलिसांनी रात्री आरोपीसोबत तपास केला असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला वांद्रे पोलिस स्टेशनलाही नेण्यात आलं होत. सैफच्या घरी रात्रभर कसून तपास करण्यात आला असून आरोपीला पोलिस ३ ठिकाणी घेऊन गेले होते.
पोलिस सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोण-कोणत्या ठिकाणी घेऊन गेले जाणून घ्या...
१ मोहम्मद शरिफूल इस्लाम शहजाद याला घेऊन पोलिस सैफ अली खानच्या घरी गेले
२ त्यानंतर पोलिस शहजादला घेऊन नॅशनल कॉलेजच्या बस स्टॉपवर गेले
३ पोलिस शरीफूलला घेऊन सीन रिक्रीएट करताना बांद्रा पोलिस स्टेशनला देखील गेले