शिवसेनेच्या मंत्र्यांना जनता दरबाराचं वावडं आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश देऊनही शिवसेनेचे मंत्री जनता दरबार भरवत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना बाळासाहेब भवनात जनता दरबार घेण्याचे आदेश दिले होते. मात्र शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंचेच आदेश मानत नसल्याचं चित्र आहे, शिवसेनेचे मंत्री जनता दरबार घ्यायला घाबरतात का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.