बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर, श्री सिध्देश्वर महाराज कि जय असा गजर आजपासून सोलापुरात घुमणार असून संपूर्ण राज्याला आकर्षण असलेल्या सोलापुरच्या सिध्दरामेश्वरांच्या विवाह सोहळ्याला आज सुरुवात झाली आहे. तर सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या शहरातील 68 लिंगांना तेलाभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात होते. श्री सिध्देश्वर यात्रेसाठी महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सुमारे 900 वर्षांपासून अधिक हि यात्रा रूढी आणि परंपरेनुसार अखंडपणे चालू आहे. श्री सिद्धरामेश्वारांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिगांना तेलाभिषेक करण्याची परंपरा आहे. शहरातील असलेल्या हिरेहब्बूच्या मठातून नंदीध्वजाच्या मिरवणुकीला सुरुवात होती. यावेळी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजाची पूजा करून नंदीध्वजाच्या भक्तिमय वातावरणात शहरातील असलेल्या 17 किमी अंतरावरचा 68 लिगांना तेलाभिषेकासाठी नंदीध्वज मार्गस्थ होतात.