थोडक्यात
काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती
25 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता
घटस्थापनेला मुंबईमध्ये हलक्या सरी बरसणार
(Weather Update ) राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात होणार असून 25 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घटस्थापनेला मुंबईमध्ये हलक्या सरी असतील, अशी शक्यता असून काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती.