थोडक्यात
पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी
संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी होणार
हवामान विभागाने वर्तवला अंदाज
(Maharashtra Weather Update ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं.
राज्यात 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल असे देखील सांगण्यात आले. आता पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाने उघडीप दिल्याने काही भागात तापमानाचा पारा चढा आहे.
संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसानंतर आता फारशा पावसाची शक्यता नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता कमी असेल. असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे.