अध्यात्म-भविष्य

एकादशीच्या दिवशी 'तांदळाचा भात' का खाऊ नये? जाणून घ्या

एकादशीचा दिवस विष्णूपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी तांदळाचा भात खाण्यास मनाई आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Ekadashi Tithi : एकादशीचा दिवस विष्णूपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी तांदळाचा भात खाण्यास मनाई आहे. एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यास ते मांसाहाराच्या बरोबरीचे मानले जाते. पण एकादशीच्या दिवशी भात खाणे का टाळावे याचे कारण तुम्हाला माहित आहे का?

पौराणिक कथेनुसार, माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता, त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले. त्या दिवशी एकादशी तिथी होती. असे म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ रूपात झाला होता, म्हणूनच तांदूळ हे सजीव मानले जातात, त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही. एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्त सेवन केल्यासारखे मानले जाते.

एकादशीच्या दिवशी भात न खाण्याचे शास्त्रीय कारणही आहे. असे मानले जाते की तांदळात पाण्याचे प्रमाण अधिक असते, चंद्राचा पाण्यावर अधिक प्रभाव असतो आणि चंद्र हा मनाचा अधिपती ग्रह आहे. भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होते. मन चंचल राहिल्याने उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येतो. यामुळेच एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेल्या पदार्थ खाणे टाळावे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला