या वर्षी देशात अनेक मोठ्या घटना घडल्या ज्यांची खूप चर्चा झाली. यंदाचे 2024चे वर्ष वेगवेगळ्या ट्रेंडने पुरुन उरला. अनेक गाणी, नवीन ट्रेंड, तर काही घटना ज्यामध्ये अनंत अंबानी यांच लग्न असो अनेक गोष्टी ट्रेंडचा विषय ठरल्या आहेत. अशातच 2024मध्ये अशा काही नवीन शब्दांचा उगम झाला जे आपण कधी ऐकले देखील नव्हते. यातील काही शब्द अतिशय मजेदार आहेत. हे शब्द अजून ही ट्रेंड बनून राहिले आहेत. आपल्याला एखादा शब्द अडला, त्याचा अर्थ समजला नाही की आपण गूगलवर सर्च करतो. 2024 मध्ये ट्रेंडमध्ये आलेल्या या शब्दांचा अर्थ जाणून घ्या.
'जेन-झी' Gen-Z
सोशल मीडियाचा वापर हा आता जवळजवळ प्रत्येक वयोगटातील मंडळी करत आहे. सोशल मीडियावर जेन-झी हा शब्द अनेक लोकांच्या रिलमधून पोस्टमधून समोर आला पण जेन-झी म्हणजे काय हा प्रश्न अनेक लोकांना पडला होता. जेन-झी एका विशिष्ट दशकात जन्माला आलेल्या पिढीला या नावाने ओळखलं जात. जस की, 1980 ते 1990 च्या काळात जन्माला आलेल्या पिढीला ‘मिलेनियल्स’ असं म्हणतात.त्याचप्रमाणे1990ते 2000च्या सुरुवातीच्या टप्प्यात जन्माला आलेल्या पिढीला जेन-झी असं म्हणतात.
'पुकी' Pookie
सोशल मीडियावर अनेकांच्या पोस्टमध्ये Pookie हा शब्द दिसला असेल किंवा सध्या अनेक तरुण मुल-मुली हा शब्द बोलताना दिसून येतात. Pookieचा अर्थ शोधण्याचे कारण म्हणजे दक्षिणी जोडपे कॅम्पबेल आणि जेट पकेट. जेटने त्याच्या पत्नीचा उल्लेख करण्यासाठी Pookieहा शब्द अनेक वेळा वापरला आणि ट्रेंडसह भारतात लोकप्रिय झाला. या शब्दाचा अर्थ म्हणजे सुंदर, छान किंवा एखाद्याच्या सौंदर्याचे कौतुक करणे असा आहे.
'स्नायपर स्निपर वाइव्ही वाईव्ही' sniper sniper wifey wifey
"स्नायपर स्निपर वाइव्ही वाईव्ही" हा ट्रेंड हॅशटॅगने सुरु झाला जसं की,#sniperwifeytrend, #sniper, आणि #wifey या हॅशटॅगसह मेकअप लूक, लग्नाशी संबंधित सामग्री आणि इतर पोस्ट सामायिक करणारा ट्रेंड म्हणून या शब्दांचा वापर केला जातो.
'गोट'GOAT
2024 मध्ये क्रिकेटच्या क्षेत्रात सोशल मीडियावर GOAT हा शब्द अत्यंत लोकप्रिय झाला आहे. क्रिकेटर्सच्या किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विशिष्ट क्षेत्रातील कामगिरीबद्दल खूप प्रशंसा आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. याचा अर्थ Greatest of All Time असा आहे.
'डेलूलू' Delelu
डेलूलू या शब्दाचा अर्थ काल्पनिक जग असा आहे. जी गोष्ट अस्तित्वात होण कठीण असेल किंवा ती गोष्ट खरी होणारच ती अशावेळेस डेलूलू हा शब्द वापरला जातो.