DONALD TRUMP ANNOUNCES TARIFF DIVIDEND SCHEME FOR AMERICAN CITIZENS
Donald Trump

Donald Trump : लाडका अमेरिकन योजना! नागरिकांच्या खात्यात थेट पावणे दोन लाख रुपये, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

US Economy: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमधून मिळालेल्या उत्पन्नातून अमेरिकन नागरिकांच्या खात्यात थेट २००० डॉलर देण्याची घोषणा केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या कार्यकाळात आक्रमक व्यापारी धोरण राबवत जगभरातील देशांवर टॅरिफ लादले आहेत. भारतावर ५० टक्के टॅरिफचा फतवा जारी करून त्यांनी अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचे वचन पूर्ण केले आहे. आता या टॅरिफमधून मिळालेल्या कमाईचा लाभ सामान्य नागरिकांना देण्याची मोठी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की, लवकरच बहुतांश अमेरिकन नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये टॅरिफ लाभांश म्हणून २००० अमेरिकन डॉलर्स (सुमारे १ लाख ७७ हजार २६९ रुपये) जमा केले जातील. उच्च उत्पन्न गट वगळता इतरांना हा लाभ मिळेल, ज्याप्रमाणे भारतातील पीएम किसान किंवा महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना कार्यरत आहेत.

DONALD TRUMP ANNOUNCES TARIFF DIVIDEND SCHEME FOR AMERICAN CITIZENS
Sanjay Raut : ठाकरे बंधूची युती कधी होणार? संजय राऊतांनी सांगितले...

ट्रम्प यांनी म्हटले, "टॅरिफमुळे अमेरिका कित्येक ट्रिलियन डॉलर्स कमाई करत आहे. हे ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जाच्या कपाटावर पहिले पाऊल आहे. टॅरिफचा विरोध करणारे मूर्ख आहेत. आता महागाई नाही, स्टॉक मार्केट विक्रमी उच्चांकावर आहे, गुंतवणूक वाढली आहे आणि अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत, सन्मानित देश बनली आहे." अमेरिकन अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १९५ अब्ज डॉलर्सची टॅरिफ ड्युटी वसूल झाली आहे. ट्रम्प यांच्या धोरणाने उत्पादन क्षेत्राला नवी ताकद मिळाली असून रोजगार वाढतो आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र, या घोषणेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

DONALD TRUMP ANNOUNCES TARIFF DIVIDEND SCHEME FOR AMERICAN CITIZENS
Municipal Elections: महापालिका निवडणुकीचा धडाका! मुंबईसह १३ महापालिकांना ७४ कोटींचा मोठा निधी

दरम्यान, ट्रम्पांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले आहे. कनिष्ठ न्यायालयांनी हे धोरण राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारकक्षेबाहेरीचे असल्याचे म्हटले आहे. इंटरनॅशनल इमरजन्सी इकोनॉमिक पॉवर कायद्याचा दुरुपयोग झालाय का, याचा निकाल सुप्रीम कोर्ट लवकरच देईल. एकतर्फी टॅरिफ लावून महसूल गोळा करता येईल का, हे ठरेल. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जागतिक व्यापारावर परिणाम होत असून, भारतासह इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे. या घडामोडींमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या भविष्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

DONALD TRUMP ANNOUNCES TARIFF DIVIDEND SCHEME FOR AMERICAN CITIZENS
Donald Trump: तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर थेट बी-2 बॉम्बर विमानांचं उड्डाण, ट्रम्प यांचा मोठा निर्णय
Summary
  • ट्रम्प यांची टॅरिफ लाभांश योजना जाहीर

  • अमेरिकन नागरिकांना थेट २००० डॉलर देण्याचा दावा

  • टॅरिफ धोरणावर सुप्रीम कोर्टात कायदेशीर आव्हान

  • जागतिक व्यापार व भारतासह इतर देशांवर परिणाम

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com